You are currently viewing …तर चोलामंडलमच्या कणकवली शाखेला टाळे ठोकणार!!

…तर चोलामंडलमच्या कणकवली शाखेला टाळे ठोकणार!!

कर्जदारांचा चोळामोळा करून टाकणाऱ्या चोलामंडलम् फायनान्सच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची चौकशी व्हावी : संघर्ष समिती जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार पुराव्यासह तक्रार

व्हेईकल फायनान्सच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या चोलामंडलम् फायनान्सच्या आर्थिक व्यवहाराबाबत अनेक कर्जदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. ॲडीशनल इंटरेस्ट, चेक बाऊन्स अँड अदर चार्जेस अशा नावाखाली अवास्तव आकारणी करत कर्जदारांना लुबाडण्याचा गोरखधंदा चोलामंडलम फायनान्सने चालवला आहे. कर्जमुदत संपल्यानंतर चेक बाऊन्स सदराखाली अवास्तव रक्कम आकारत गाडी कर्जदारांच्या नावावर देण्यात आडकाठी करत रक्कम वसूल केली जाते. चेक बाऊन्ससाठी किती रक्कम आकारली जावी, अदर चार्जेस म्हणजे नेमके काय याबाबत सारेच गौडबंगाल असून विचारणारे कोणी नसल्याने अक्षरशः लूटमार चालली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व संबंधित विभागांकडे चोलामण्डलम् च्या कणकवली शाखेच्या व्यवहारांची संघर्ष समिती तक्रार दाखल करत आहे. ज्या कर्जदारांच्या याबाबत आणखी तक्रारी असतील त्यांनी महाराष्ट्र कर्जदार जामिनदार हक्क बचाव संघर्ष समितीच्या परिचित कार्यकर्त्यांकडे आपल्या तक्रारी द्याव्यात किंवा +91 70578 33777 या क्रमांकावर व्हाट्सअपने पाठवाव्यात. सिंधुदुर्गात असला पठाणी व्यवहार चालू देणार नाही, तक्रारी नंतरही कर्जदारांना वेळेत न्याय मिळाला नाही, तर संघर्ष समितीतर्फे चोलामंडलमच्या कणकवली शाखेला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र कर्जदार जामिनदार हक्क बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड प्रसाद करंदीकर यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा