You are currently viewing भंडारी ज्ञाती बांधव संपर्क अभियानाची सुरवात..

भंडारी ज्ञाती बांधव संपर्क अभियानाची सुरवात..

मालवण

भंडारी ज्ञाती बांधवांनी एकत्रित येऊन भंडारी भवनाची वास्तू निर्मिती करण्यासाठी रेवंडी येथील भद्रकाली मंदिरात श्रीफळ वाढवून भंडारी ज्ञाती बांधव संपर्क अभियानाची सुरवात करण्यात आली.

यावेळी भाई गोवेकर, मालवण भंडारी मंडळाचे अध्यक्ष रवींद्र तळाशीलकर, युवराज कांबळी, जयराम कांबळी, अरुण कांबळी, राजू आंबेरकर, यशवंत मिठबावकर, भालचंद्र कवटकर, बाबा गोलतकर, यजुवेंद्र हडकर, विलास चेंदवणकर, अमोल वस्त, नरेश करलकर, विजय कांबळी सुंदर कांबळी, अजीत कांबळी, सुभाष कांबळी, मिलिंद कांबळी, रविंद्र केळुसकर, विकास चेंदवणकर, मनोदया कांबळी, प्रकाश तोंडवळकर, राजकुमार शेडगे, आनंद गोलतकर, प्रभाकर चिंदरकर, गणपत गोलतकर, अनिरुद्ध हडकर, मनाली करंगुटकर, शंकर वस्त, राजन पांगे, समीर बावकर यांच्यासह अन्य समाजबांधव उपस्थित होते.

तालुक्यातील भंडारी ज्ञाती बांधवांशी संपर्क वाढवून समाजाच्या उन्नतीसाठी हातभार लावूया असे आवाहन भाई गोवेकर यांनी केले. भंडारी समाज बांधवांच्या संपर्क अभियानासोबत आम्ही भंडारी ज्ञाती बांधवांच्या सहकार्यातून येत्या काही दिवसात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करणार आहोत. भंडारी बांधवांसाठी वधू-वर सूचक मेळाव्याचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे रवींद्र तळाशीलकर यांनी स्पष्ट केले. भंडारी समाजबांधवांनी एकत्र येत भंडारी भवनाच्या संकल्पास साथ देऊया, असे आवाहन युवराज कांबळी यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा