रियाला १४ दिवस न्यायालयीन कोठडी
मुंबई / प्रतिनिधी :-
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांनी अनेकदा विविध व्यक्तींच्या माध्यमातून अमली पदार्थ मागवल्याची आणि विकत घेतल्याची कबुली अटक आरोपी दीपेश सावंत याने दिल्याचे एनसीबीने न्यायालयाला सांगितले होते.
एनसीबीने रियाला अटक केली असून, तिला १४ दिवसाची कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. रियाला व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे न्यायालयात हजार करण्यात आले. रियाचा भाऊ शौवीक याची ही चौकशी झाली. ड्रग्स रॅकेट मधे सहभागी असलेल्या इतर बॉलीवुड करालारांची नावे ही दोघांनी उघड केली आहे. बॉलीवुड मधे होणाऱ्या ड्रग्स ची तस्करी आणि पार्ट्या या वरही दोघांनी खुलासा केला आहे.