You are currently viewing कुडाळ तालुक्यातील शाळांना वीजबिल भरण्यासाठी मंजूर असलेले जिल्हा परिषद सेस फंड अनुदान अद्यापही प्राप्त नाही

कुडाळ तालुक्यातील शाळांना वीजबिल भरण्यासाठी मंजूर असलेले जिल्हा परिषद सेस फंड अनुदान अद्यापही प्राप्त नाही

प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गने वेधले शिक्षणाधिकारी यांचे लक्ष; व्यक्त केली नाराजी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना वीजबिल भरण्यासाठी व किरकोळ दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा परिषद सेस फंड अंतर्गत इयत्ता १ ली ते ५वी शाळांसाठी ₹ ४९००/- व १ ली ते ७ वी शाळांसाठी ₹  ५९००/- अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
परंतू जिल्ह्यातील शाळांना हे अनुदान मागील महिन्यातच प्राप्त झाले असून फक्त कुडाळ तालुक्यातील एकाही शाळेला हे अनुदान प्राप्त झाले नाही,ही बाब महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गने आज दिनांक १६/०३/२०२१रोजी शिक्षणाधिकारी यांना निवेदन देवून निदर्शनास आणली.
जिल्हा परिषद शाळांनी पुरेसे अनुदान नसल्याने व विजबिलाची रक्कम मोठी असल्याने वीजबिल अद्यापही भरले नाही. मार्चअखेर असल्याने वीजवितरण कंपनीकडून थकीत वीजबिल असणाऱ्या कुडाळ तालुक्यातील शाळांचा वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कुडाळ तालुक्यासाठी जिल्हा परिषद सेस फंड अंतर्गत ₹१३,०५,९००/- अनुदान दिनांक १९/०१/२०२१ रोजी कुडाळ तालुक्याला वर्ग करण्यात आले आहे.परंतु हे अनुदान अद्यापही शाळांच्या खात्यावर जमा नसल्याने प्राथमिक शिक्षक भारतीने नाराजी व्यक्त केली असून कुडाळ तालुक्यातील प्राथमिक शाळांच्या खात्यावर जिल्हा परिषद सेस फंड अनुदान त्वरित जमा करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गने केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा