You are currently viewing राज्यस्तरीय अवयव दान पोस्टर स्पर्धेत राम बिबवणेकर राज्यात प्रथम..

राज्यस्तरीय अवयव दान पोस्टर स्पर्धेत राम बिबवणेकर राज्यात प्रथम..

कासार्डे

चिपळूण येथील TWJ कंपनी तर्फे आयोजित अवयव दान या विषयावरील ‘राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व आणि पोस्टर स्पर्धेत’ कुडाळ तालुक्यातील बिबवणे येथील राम सूर्यकांत बिबवणेकर या विद्यार्थ्याने पोस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
आपल्या समाजामध्ये अवयव दानाबद्दल असलेल्या गैरसमजुती दूर करण्यासाठी आणि जागरूकता पसरविण्यासाठी चिपळूण येथील TWJ या संस्थेच्या द सोशल रिफॉर्म्स विभागातर्फे जागतिक मूत्रपिंड दिनानिमित्त अवयव दान या विषयावर ‘खुल्या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व आणि पोस्टर स्पर्धा’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असल्यामुळे राज्यभरातून मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
यामध्ये पोस्टर स्पर्धेत कु. राम बिबवणेकर, बिबवणे ता. कुडाळ (प्रथम), सौ. स्नेहा कानिटकर, इचलकरंजी (द्वितीय), कु. वैष्णवी लाहिम, चिपळूण (तृतीय) क्रमांक तर कु. अवनी पांचाळ, विरार, कु. सायली पालांडे, गुहागर, कु. शुभम वाडये, रामेश्वर, देवगड आणि कु. मैविश चिपळूणकर पाली, चिपळूण यांनी उत्तेजनार्थ बक्षिसे पटकाविली आहेत. तर वक्तृत्व स्पर्धेत कु. ओम देवकर, आरे, गुहागर (प्रथम), सौ. स्नेहा कानिटकर, इचलकरंजी (द्वितीय), कु. रुद्र पालकर, टिटवाळा (तृतीय) क्रमांक तर सौ. रोहिणी कोठावरे, मुंबई, कु. ओंकार साळुंखे, सांगुळवाडी, वैभववाडी, अजय अंधारे, जालना आणि सौ. रेवती करादगे, चिपळूण उत्तेजनार्थ बक्षिसे पटकाविली आहेत. सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच सर्व स्पर्धकांना E-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
सर्व विजेत्यांचे TWJ चे कोकण विभाग प्रमुख संकेश घाग, द सोशल रिफॉर्म्सचे प्रमुख प्रसन्न करंदीकर यांनी अभिनंदन केले. स्पर्धेच्या आयोजनासाठी द सोशल रिफॉर्म्सचे रविदास कांबळे आणि शुभम लाड यांनी परिश्रम घेतले.

राम बिबवणेकर

प्रतिक्रिया व्यक्त करा