You are currently viewing दानत

दानत

मागणं नव्हतं काही, देण्याचीच ती भाषा होती,
घेणाऱ्याने घेतंच रहावे, हिच छोटी अपेक्षा होती.

रिते होते हात माझे, दानत नव्हती बदलली,
काळजाच्या तुकड्यासाठी काळजाचीच नशा होती.

रितच वेगळी जगाची, ना रितीची समज होती.
डोंगरा आडून येतो सूर्य, चुकीचीच ती दिशा होती.

हृदयातील शब्दांसाठी ना हृदयी जागा होती.
सुन्या त्या उत्तरासाठी हृदयाचीच वाईट दशा होती.

प्रेम माया ममता, अपार मनी साठली होती.
का द्यावी ती व्याजाने,परताव्याची ना आशा होती.

(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा