सिंधुदुर्ग :
जिल्हा परिषदेमार्फत शाळा दुरुस्ती तसेच नवीन शाळा बांधणी कामे मंजूर आहे मात्र मार्च अखेर आली तरी ही कामे सुरू झालेली नाही पावसाळ्या अगोदर शाळा दुरुस्ती न झाल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे तसेच यामुळे शाळेत एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी केला या मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास संबंधित मक्तेदार आवर प्रतिदिनी १०० रुपये दंड आकारण्यात यावा अशा सूचना जि. प. अध्यक्षांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या
जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत मंजूर करण्यात आलेल्या 2019-20 अंतर्गत कामांची मार्च 21 पर्यंत शाळा दुरुस्त नाही झाल्या तर जोखीम पत्करावी लागेल. जि. प. शाळेच्या कामांना मंजुरी देण्यासाठी पालकमंत्र्यांना वेळ आहे का? असा सवाल कुबल यांनी दिला अति जोखमीच्या शाळा दुरुस्त न झाल्यास तिथे काही प्रकार घडल्यास त्याला पालक मंत्री जबाबदार राहतील, असे कुबल यांनी सांगितले.