You are currently viewing सावंतवाडीचा पर्यटन दृष्टया विकास करण्यासाठी महासंघाचे प्रयत्न स्तुत्य

सावंतवाडीचा पर्यटन दृष्टया विकास करण्यासाठी महासंघाचे प्रयत्न स्तुत्य

युवराज लखमराजे भोसले यांचे गौरवोद्गार
पर्यटन महासंघाला राजघराण्याचा सक्रिय पाठिंबा

सावंतवाडी
सावंतवाडी संस्थानला एक ऐतिहासिक आणि वैभवशाली परंपरा आहे.सिंधुदुर्ग जिल्याचा पर्यटनाच्या द्रुष्टीने विचार करता संस्थानकालीन सुंदर अशा मोती तलावाच्या काठावर असलेला प्रशस्त आणि आकर्षक राजवाडा हा देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांचा एक आकर्षण बिंदू आहे.सावंतवाडीचे ते वैभव आहे आणि म्हणूनच ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या सावंतवाडीचा पर्यटनद्रुष्ट्या विकास करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थाशी समन्वय साधून काम करण्याचा सिंधुदुर्ग जिल्हा व्यवसायिक पर्यटन महासंघाचा उपक्रम स्तुत्य असून अशा सकारात्मक चळवळीला राजघराण्याचा सक्रीय पांठिबा राहिल असे आश्वासन युवराज लखमराजे यांनी दिले.
सावंतवाडी राजवाड्यात महासंघाचे कार्याध्यक्ष सतीश पाटणकर, जिल्हा सचीव ॲड.नकुल पार्सेकर, जिल्हा उपाध्यक्ष डि.के.सावंत व सावंतवाडी तालुक्याचे उपाध्यक्ष जितेंद्र पंडित यांनी युवराज लखमराजे व युवराज्ञी सौ.श्रध्दादेवी भोसलें यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
आजच्या बदलत्या परिस्थितीत जग वेगाने बदलत आहे अशावेळी आपण सगळ्याच घटकानी व्यापक विचार केला पाहिजे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर देश विदेशातील पर्यटक यायला हवे तर त्यासाठी योग्य नियोजन करून त्याची अमंलबजावणी करणे गरजेचे आहे, असेही युवराज लखमराजे यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी शहरात त्या द्रुष्टीने काही पर्यटन पुरक छोटेमोठे प्रकल्प आणता येतील का यावरही सविस्तर चर्चा झाली. त्यासाठी लखमराजे यांनी आपला सक्रीय पांठिबा दिला असून परस्पर सहकार्यानेच हे घडू शकते असा विश्वासही त्यानी व्यक्त केला.
सावंतवाडी संस्थानच्या अकराव्या पिढीचं नेतृत्व करताना आजच्या परिस्थितीनुसार लखमराजे यांनी घेतलेल्या या सकारात्मक भूमीकेचं महासंघाच्या पदाधिकाऱ्यानी स्वागत केले असून राजघराण्याच्या सहकार्याने काही लक्षवेधी काम करण्याचा महासंघाचा इरादा असल्याचे यावेळी कार्याध्यक्ष सतीश पाटणकर यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा