You are currently viewing भडास

भडास

सर्वच सहन होत नाही,
कधीतरी येतो राग.
मनावरचा ताबा सुटून,
स्वभावाला पडतो डाग.

भडास ती मनातली,
कधीतरी उसळून वर येते.
प्रेमापेक्षा रागाची मात्रा,
किंचितशी वरचढ ठरते.

एक मन सांगत असतं,
संयमाने घे जरा.
वेळ निघून गेली की,
वाहेल मायेचा झरा.

कितीवेळा पाझर फोडला,
मी दगडाच्या या हृदयाला.
माझ्यासाठी उरलंच नाही,
किती त्याच्या वाटणीला.

आवर घातला रागाला,
रागापेक्षा प्रिय वाटलं नातं.
आंधळे करतो राग डोळे,
आपलंच मन मनाला खातं.

एकाने रागात बोललं तर,
दुसऱ्याने संयम ठेवावा.
नातं जपल्याचा आनंद मग,
चारचौघात खुशाल मिरवावा.

एक वेळ अशी येईल,
नातं तोडून टाकावं वाटेल.
सहज जुळत नसतात ती,
उरात दुःखाचा डोंगर साठेल.

मनामागे तू धावू नकोस,
कधी कधी वाचाळ बोलतं.
बोललेल्या एका शब्दाने,
हृदय मात्र घायाळ करतं.
हृदय घायाळ करतं…!!

(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा