You are currently viewing शिक्षक समिती आयोजित ऑनलाईन उखाणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिक्षक समिती आयोजित ऑनलाईन उखाणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधूदुर्ग
‘सोन्याची सुई रिळाच्या घोळात, रावांचे नाव घेते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या मेळाव्यात. ‘ काहीही म्हणा माझे राव आहेतच ग्रेट करोनाचे लक्षण दिसताच डाॅक्टरांना भेटा थेट’ अशा विविध सामाजिक विषयांवर आधारित एका मिनिटात शिक्षक समिती सावंतवाडी महिला आघाडीच्या वतीने आयोजित ऑनलाईन उखाणे स्पर्धेला प्राथमिक महिला शिक्षिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एकत्रित येऊन महिला दिन साजरा करणे अशक्य असले तरी महिला शिक्षिकांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
प्रथम क्रमांक -चंद्रकला मधुकर भोसले कोलगाव नं.२ द्वितीय क्रमांक (विभागून) सपना संदीप गायकवाड चौकुळ मळववाडी व व शुभेच्छा संदीप सावंत केंद्रशाळा बांदा नं. १
तृतीय क्रमांक:- वंदना दिलीप शितोळे केंद्रशाळा बांदा नं. १ चतुर्थ :- रूपाली प्रणय नाईक आजगाव नं. १ पाचवा:-सुजिता शंकर येझरे आंबोली मुळवंदवाडी उत्तेजनार्थ:-नयना गोविंद परब आंबोली नं५ सतीचा वाळ व स्वाती जक्कापा पाटील कास नं .१
या स्पर्धेतील यशस्वी व सहभागी स्पर्धकांचे
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सावंतवाडी शाखेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी समिती अध्यक्ष सतिश राऊळ,सचिव अमोल कोळी,शिक्षक नेते नारायण नाईक, महिला आघाडी अध्यक्षा कविता धुरी, स्वाती पाटील, धनदा शिंदे व महिला आघाडी शिक्षिकांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा