You are currently viewing सावंतवाडी आरोस बाजारमार्गे आरोंदा एसटी सुरू करा…

सावंतवाडी आरोस बाजारमार्गे आरोंदा एसटी सुरू करा…

दांडेली ग्रामपंचायतची मागणी; विद्यार्थ्यांसह प्रवाशांची होते गैरसोय…

सावंतवाडी
दांडेली मार्गे सकाळी ९:३० वाजता जाणारी सावंतवाडी आरोंदा ही एसटी बस कोरोना काळात जवळजवळ एक वर्ष बंद आहे. प्रवाशांची व शाळेतील मुलांची गैरसोय लक्षात घेता व कोरोनाचा झालेला प्रभाव पाहता एसटी बस सुरू करण्यात यावी,अशी मागणी दांडेली ग्रामपंचायतच्या वतीने सावंतवाडी बसस्थानक आगारप्रमुख यांच्याकडे करण्यात आली आहे.दरम्यान दांडेली ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्लता मालवणकर यांनी लिपिक राम वाडकर यांच्याकडे आगारप्रमुखांना मागणीचे निवेदन दिले.
सावंतवाडी आरोंदा ही एसटी बस निरवडे, न्हावेली, दांडेली या गावातून जाते. विद्याविहार इंग्लिश स्कूल आरोस मधील विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी या एसटीचा चांगल्या प्रमाणात उपयोग होतो. कोरोना काळात बंद असलेल्या शाळा पुन्हा एकदा चालू झाल्याने आता विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु त्यांना शाळेपर्यंत ये जा करण्यासाठी बस उपलब्ध नसल्याने पुन्हा अडचण निर्माण होऊ नये म्हणून, दांडेली ग्रामपंचायततर्फे सदर एसटी बस पुन्हा कायमस्वरुपी सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, सावंतवाडी आगारकडून एसटी बस सुरू करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्लता मालवणकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा