You are currently viewing नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी निवड

नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी निवड

नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी निवड

मुंबई / प्रतिनिधी :-

पीडित महिलांसाठी आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध उपसभापतीपदी आज निवड करण्यात आली. दरम्यान, यावेळी भाजपाने सभात्याग केला. महाविकास आघाडीकडून उपसभापतीपदासाठी नीलम गोऱ्हे यांच्या नावाची निवड करण्यात आली होती. तर भाजपाकडून भाई गिरकर यांनी अर्ज भरला होता. परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर गिरकर यांनी अर्ज मागे घेत बिनविरोध नीलम गोऱ्हे यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली.

दरम्यान, उपसभापती निवडणुकीच्या वेळी भाजपाने सभात्याग केला. निवडणुकीपूर्वी भाजपाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, याबाबतचा निकाल गुरूवारी न्यायालय देणार असल्याची माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली. तसेच या ठिकाणी न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणूक घेऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केली. यावर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगत. आवाजी मतदान घेण्यात आले आणि नीलम गोऱ्हे यांची उपसभापतीपदी नियुक्ती करण्यात आली.
न्यायालयाने आपल्याला बोलावले नाही.

न्यायालयाने निकालाबद्दल सांगितलं नाही. म्हणून हे मान्य करता येणार नाही. निवडणुकीचा प्रश्न नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. उच्च न्यायालयानं समन्स दिले तर त्यावर आपण उत्तर देऊ,” असे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यावेळी म्हणाले. त्यांच्या नियुक्तीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांची उपसभापतीपदी दुसऱ्यांदा निवड झाली असून त्यांच्या यशाची कमान अशीच उंचावत जावो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांना शुभेच्छा देताना म्हणाले. सध्या करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसीय अधिवेशन बोलावण्यात आले आहे. परंतु या अधिवेशनादरम्यान अनेक सदस्य अनुपस्थित आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा