वेंगुर्ला / प्राची वडाणकर :
परुळे बाजार येथील ग्रामस्थ मनोहर सामंत यांच्या विहिरीत शिकारी ला आलेला बिबट्या सकाळी पाचच्या सुमारास विहिरीत पडला. कित्येक दिवस या बिबट्याने तेथील परिसरात पाळीव प्राण्यांवर हल्ले करत दहशत निर्माण केली होती. सकाळी 9.30 च्या सुमारास या बिबट्याची विहिरीतून सुटका करण्यात आली. त्या बिबट्याला वाचवण्यासाठी तेथील ग्रामस्थांनी एक लाकडाची फळी त्याला सपोर्ट साठी पाण्यात टाकली. त्यानंतर काही वेळाने त्याला पिंजऱ्या घालून विहिरीतून बाहेर काढण्यात आले.