देवगडचा संयम संजय सोमण लक्षवेधी
देवगड
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सायकलिंग करा, तंदुरुस्त राहा, प्रतिकारशक्ती वाढवा आणि रोगमुक्त व्हा अशा आशयाचा संदेश देणारी सायक्लोथॉन सुवर्णसूर्य फाउंडेशन तर्फे हेदवी ते गणपतीपुळे व्हाया राई भातगाव पूल या ७२ किलोमीटर मध्ये आयोजित केली गेली. रत्नागिरी जिल्ह्यांतर्गत लांब पल्याची नजीकच्या काळात आयोजित केली गेलेली ही पहिलीच सायक्लोथॉन होती. चिपळूण, खेड, रत्नागिरी, दापोली, गुहागर, देवगड तालुक्यातील जवळपास ३९ सायकल प्रेमींनी या सायक्लोथॉन मध्ये सहभाग नोंदवला.
हेदवी गणपती मंदिराचे अध्यक्ष डॉ. जोगळेकर, सेक्रेटरीप्रसादओक , सुवर्णसूर्य फाउंडेशन चे संचालक श्री प्रसाद व सौ तेजा देवस्थळी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून या सायक्लोथॉन ला हिरवा कंदील दाखवण्यात आला. लहान मोठ्या अशा जवळपास २७ गावांमध्ये या उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती झाली. चिपळूण येथील विक्रांत आलेकर यांनी हे अंतर ३ तास ४ मिनिटात पार करून सुवर्णपदकाला गवसणी घातली चिपळूण सायकल क्लबच्याच आकाश लकेश्री यांनी हेच अंतर ३ तास ५ मिनिटात पार करून तर प्रसाद आलेकर यानी ३ तास ६ मिनिटात पार करून अनुक्रमे रौप्य आणि ब्रॉंझ पदकावर आपले नाव कोरले. पदकाव्यतिरिक्त रुपये ५००१ रोख,३००१ रोख व २००१ रोख असे अनुक्रमे प्रथम ३ क्रमांकाना देण्यात येणाऱ्या बक्षिसाचे स्वरूप होते.
दापोलीच्या सौ. मोहिनी पाटील आणि श्री.मिलिंद खानविलकर तसेच गुहागरच्या श्री अनंत गणपत तानकर याना रुपये १००१ व मेडल अशा स्वरूपाचे उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागी सर्व स्पर्धकाना सहभाग प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले. शेतकऱ्याच्या हस्ते बक्षीस समारंभ संगमेश्ववर तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी ८६ वर्षीय श्री वासुदेव शिवराम बोंद्रे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. याप्रसंगी वझे असोसिइट्स चे शरद वझे, मैत्री ग्रुपचे सुहास ठाकुरदेसाई, आर्यक सोल्युशन्स चे ऋषीकेश सरपोतदार, फ़िनॉलेक्स कॉलेज मध्ये कार्यरत असणारे श्री अमेय रायकर व आर्यक एज्युकेअर चे प्रशांत ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
गणपतीपुळ्याच्या महालक्ष्मी हॉल येथे संपन्न झालेल्या या सायक्लोथॉन चे एलआयसी रत्नागिरी आणि डीलाईट इंडस्ट्रीज सह प्रायोजक होते. या स्पध्रेत सहभागी झालेल्या रिटायर्ड airforce ऑफिसर माधव काळे (५७) आणि सौ निर्मला काळे(५५) ह्या चिरतरुण जोडप्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी शर्यत पूर्ण केली शेतकरी, डॉक्टर,इंजिनीयर पासून , हॉटेल व्यावसायिक,गृहिणी अशासमाजाच्या विविध स्तरातील सायकलप्रेमींनी सहभाग घेतल्यामुळे ही सायक्लोथॉन खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक झाली सय्यम संजय सोमण(१८) देवगड ह्याने देखील ही स्पर्धा लक्षवेधी वेळेत पूर्ण केली.