You are currently viewing मोड जत्रेने आंगणेवाडी जत्रोत्सवाची सांगता!

मोड जत्रेने आंगणेवाडी जत्रोत्सवाची सांगता!

आंगणे कुटुंबीयांनी मानले भक्तांचे आभार

मालवण

कमलपदी तुज नमितो माते
जय जय भराडी देवी…
जय जय भराडी देवी… असा ध्वनी क्षेपकावर चाललेला देवीच्या नावाचा गजर, महाप्रसादाची ताटे लावणे या विधीसाठी देवालयात येणाऱ्या सवाष्ण महिला व आंगणे ग्रामस्थांनी बहरलेला देवालय परिसर असाच काहीसा नजारा होता तो शनिवारी रात्री श्री भराडी देवालय परिसरात! प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व नवसाला पावणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी यात्रोत्सवाची सांगता रविवारी सायंकाळी मोड जत्रेने झाली.

महाप्रसादाचा अनुपम्य सोहळा
शनिवारी पहाटे ४वाजता जत्रोत्सवास प्रारंभ झाल्यानंतर महाप्रसादाचा मुख्य सोहळा रात्री ९.३० वाजता सुरू झाला. प्रसादाची ‘ताटे लावणे’ या नावाने ओळखला जाणारा हा कार्यकम अनुपम्य असा सोहळा असतो.प्रत्येक घरातील सुहासिनी मौनव्रत धारण करत बनवलेला प्रसाद नैवेद्य म्हणून घेऊन मंदिरामध्ये येतात. यालाच ताटे लावणे असे म्हणतात.रात्री १० च्या सुमारास देवालयात महाप्रसाद घेऊन आलेल्या सवाष्ण महिला पुन्हा आपल्या घरी माघारी फिरल्या.शनिवारी रात्री ९ नंतर धार्मिक विधीसाठी दर्शन रांग बंद करण्यात आली. महाप्रसादाचा ताटे लावण्याचा कार्यक्रम झाल्या नंतर रात्री ११.३०वाजता पुन्हा दर्शन रांग चालू करण्यात आली. यावेळी गोंधळ विधी देवालयात झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा