You are currently viewing मनसेमुळेच लोकप्रतिनिधी खरं बोलायला लागले….

मनसेमुळेच लोकप्रतिनिधी खरं बोलायला लागले….

विमानतळाच्या प्रलंबित प्रश्नाबाबत परशुराम उपरकर यांनीच सर्वप्रथम उठवला होता आवाज – अमित इब्रामपूरकर

मनसेमुळेच लोकप्रतिनिधी खरं बोलायला लागले असे मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की भारत सरकारच्या नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने (Directorate General of Civil Aviation) दुसर्‍यांदा परीक्षण केल्यानंतर खासदार विनायक राऊत यांनी विमानतळाच्या धावपट्टीमध्ये अद्यापही त्रुटी असल्याचे मान्य केले आहे. मनसेने जनतेसमोर विमानतळाबाबतची वस्तुस्थिती समोर आणुन जनतेला जागृत केल्यामुळेच खासदार आता खर बोलायला लागले आणि जाहीरपणे कबुली दिली.विमानतळाच्या प्रलंबित प्रश्नाबाबत सर्वप्रथम मनसेनेच आवाज उठवला होता.

मनसे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी काही दिवसापूर्वी चिपी विमानतळावर कागदी विमान उडवून सरकारच्या अपयशाचा निषेध केला होता.

चीपी विमानतळाबाबत खासदार विनायक राऊत यांनी उद्घाटनाच्या २३ जानेवारी,२६जानेवारी,१मार्च अशा तीन-तीन तारखा जाहीर केल्या.मात्र खासदारांनी जाहीर केलेला मुहुर्त प्रत्येकवेळी फसला.मुंबईकरांसोबतच त्यांनी जिल्ह्यातील जनतेची दिशाभुल केली.विमानतळाची अपुर्ण कामे मनसेनेच जनतेसमोर आणले.

खासदार विनायक राऊत यांनी चीपी विमानतळाबाबत डिजीसीएचे काही आक्षेप आहेत.धावपट्टीमध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे अजूनही त्रुटी आहेत.जोपर्यंत नागरी विमानवाहतूक महासंचालनालया(डिजीसीए) धावपट्टीला(रन-वे) अंतिम मंजुरी देत नाही तोपर्यंत प्रवासी विमानसेवा सुरू करणे योग्य नसल्याचे सांगितले आहे.म्हणजेच मनसेमुळेच खासदार खरं बोलायला लागले असे इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा