You are currently viewing हत्तीच्या हल्ल्यात मोर्ले येथील युवक जखमी

हत्तीच्या हल्ल्यात मोर्ले येथील युवक जखमी

आज संध्याकाळची घटना ; जखमीला गोव्यात राज्यात केले जातेय दाखल :

दोडामार्ग

मोर्ले येथील विश्वनाथ बाबी सुतार हे काजु बागायतीत गेले असता हत्तीच्या हल्ल्यात ते जखमी झाले असून दोडामार्ग रुग्णालयात त्यांना दाखल केले आहे. अधिक उपचारासाठी त्यांना दोडामार्ग रुग्णालयातून गोवा राज्यात दाखल केले जात असल्याची माहिती शिवसेना कोनाळ विभागप्रमुख संतोष मोर्ये यांनी दिली. तर सोनावल गावात आज हत्तींनी शेती-बागायतीचे नुकसान केले आहे. हत्तीनी भातशेतीचे नुकसान केल्याची माहीती स्थानिक ग्रामस्थ संदेश वरक यांनी दिली आहे. सोनावल गावातील शिवराम गवस, धोंडी गावडे, सुभाष देसाई, राजश्री गावडे ह्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. वनविभागाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी संदेश वरक यांनी केली आहे. भात परिपक्व होत असताना हत्ती आगमन आणि नुकसानीमुळे शेतकऱ्यांत भिती निर्माण झाली आहे. तिलारी धरण क्षेत्रात आगमन झालेल्या रानटी हत्तीनी आपला मोर्चा सोनावलहून पुढच्या गावांकडे वळवला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा