सावंतवाडी
सावंतवाडी तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अँड. पीडी देसाई यांची तर सचिव पदी अँड. अजित राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तालुका कार्यकारणी आज नव्याने निवडण्यात आली आहे. सावंतवाडी तालुका बार असोसिएशन आज शनिवारी सायंकाळी नवीन निवड संदर्भात बैठक झाली. या बैठकीत एकमताने अध्यक्ष अँड. पि डी देसाई, उपाध्यक्षपदी अँड. रवींद्र कंग्राळकर, उपाध्यक्षपदी महिला अँड. अलका राणे, सचिवपदी अँड अजित राणे, खजिनदार अँड. वैभव चव्हाण, सहसचिव महिला अँड. सायली सावंत, सहसचिव ग्रंथालय अँड. गौरव केसरकर, सदस्य अँड. संकेत नेवगी, अँड अरुण पणदूरकर, अँड लेखराज मडकईकर, अँड. आरती पवार, जिल्हा सदस्य म्हणून ज्येष्ठ वकील अँड. दीपक नेवगी, यांची निवड करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणीची निवड होताच जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर अँड. डिके गावकर अँड. शामराव सावंत अँड. नीलिमा गावडे अँड. नीता सावंत कविटकर अँड राघवेंद्र नार्वेकर अँड अमोल कविटकर अँड विरेश राहुल अँड सुभाष पणदूरकर अँड गोविंद बांदेकर आधी सर्व वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नूतन तालुका अध्यक्ष अँड पीडी देसाई यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन अँड नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले सावंतवाडी तालुक्यातील यांच्या समस्या व अडचणी मार्गे लावण्यात येतील व वकील संघटना बळकट करण्यात येईल व संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येतील असे अध्यक्ष देसाई यांनी स्पष्ट केले