You are currently viewing जिल्हा बँक व नगरपंचायत निवडणुका पार्श्वभूमीवर कुडाळ येथे महाविकास आघाडी समन्वय समिती बैठक..

जिल्हा बँक व नगरपंचायत निवडणुका पार्श्वभूमीवर कुडाळ येथे महाविकास आघाडी समन्वय समिती बैठक..

आगामी सिंधुदुर्ग जिल्हा बँक, नगरपंचायत निवडणुका पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची समन्वय समिती बैठक कुडाळ येथील एम.आय.डि.सी विश्रामगृहात पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत होत असून या बैठकीस माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एम.के. गावडे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बाळा गावडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादा परब, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हा काँग्रेस प्रवक्ते इर्शाद शेख, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत संचालक विठ्ठल डॉन्टस आदी पदाधिकारी उपस्थित राहिले आहेत.

 

दरम्यान समसमान जागा वाटपाचा फॉर्म्युला असण्यासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी हे घटक पक्षाचे पदाधिकारी आग्रही राहणार असल्याचे कळते.

प्रतिक्रिया व्यक्त करा