दोडामार्ग
महाराष्ट्र शासनाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत, “विकेल ते पिकेल” अभियानांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजाराचा शुभारंभ साटेली भेडशी येथे दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर यांच्या हस्ते झाला. यातून थेट शेतकऱ्यांकडून माल ग्राहकांपर्यंत उपलब्ध होणार आहे. विनायक पांडुरंग बेळेकर यांनी हा रयत बाजार सुरू केला आहे.
यावेळी तालुका कृषी अधिकारी शेटये मॅडम, कृषी सहाय्यक शिंदे आणि ताटे, विनायक बेळेकर, शिवदास मणेरकर, तलाठी लहाणे, साटेली भेडशी मंडळ अधिकारी सावंत, राणे व वाघमारे आदी उपस्थित होते.