सिंधुदुर्गनगरी:
भराडी देवी यात्रा आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश दुकाने- विक्रेत्यांना बंदी…
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील भराडी देवीची यात्रा 6 मार्च रोजी होणार आहे कोरोना पार्श्वभूमीवर या वर्षी केवळ अंगणी कुटुंबीयांमध्ये मर्यादित यात्रा होणार आहे कुटुंबातील 50 50 व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे अन्य भाविकांना यात्रेत वा मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
दरवर्षी आंगणेवाडी यात्रेत विविध ठिकाणाहून आलेले फिरते व्यापारी स्थानिक व्यापारी आपले विविध खाद्यपदार्थांचे वस्तूंचे खेळणी कपडे यांचे स्टॉल मंदिर परिसरात उभारतात. मात्र यावर्षी ही जत्रा आंगणे कुटुंबापुरतीच मर्यादित राहणार असल्याने तसेच कोरोना पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये या कारणास्तव मंदिर परिसरात एकही दुकानात व स्टॉल उभारता येणार नाही. मंदिर परिसरात आधीपासूनच स्थानिक ग्रामस्थांचे जे कायमस्वरूपी हॉटेल दुकाने व स्टॉल आहेत ते देखील जत्रे दिवशी बंद राहतील. अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिल्या.