You are currently viewing फोंडाघाट वनपालासह पाच कर्मचारी निलंबित

फोंडाघाट वनपालासह पाच कर्मचारी निलंबित

कणकवली:

फोंडाघाट वनक्षेत्रामध्ये औषधे गोळा करण्याकरिता आलेल्या आदिवासी कातकरी महिलेसह पाच जणांना मारहाण तेथील कर्मचाऱ्यांनी केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई झालेले फोंडाघाट वणक्षेत्राचे वनपाल शशिकांत दत्ताराम साटम, वनरक्षक संदीपकुमार सदाशिव कुंभार, सुभाष दिलीप बडते, मच्छिंद्र श्रीकृष्ण दराडे आणि वनमजूर सत्यवान सहदेव कुबल यांच्यावर अखेर सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.सोमवारी सायंकाळी उशिरा याबाबतचे आदेश प्राप्त झाले.

मारण्याची घटना 18 फेब्रुवारी रोजी घडली होती फोंडाघाट गांगोवाडी माळ येथे राहणारे कातकरी आदिवासी कुटुंबापैकी संत सखु पवार यांच्यासह अन्य पाचजण फोंडाघाट जंगलात औषधी मुळी झाडपाला गोळा करण्यासाठी गेले असताना वरील वनपाल आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण केल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली होती. त्यांच्यावर मारहाण आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून अटक झाली होती.त्यांना जिल्हा न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. कणकवलीच्या प्रभारी डी वाय एस पी डॉक्टर रोहिणी साळुंके यांनी या घटनेचा तपास करून संशयित कर्मचाऱ्यावर कारवाई केली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कांबळे यांनी कणकवली पोलिस स्टेशनला कातकरी यांच्यासोबत जाऊन तक्रार दिली आणि नाहक मारहाण केल्याबद्दल मागणी केली होती. त्यानंतर हे प्रकरण प्रभारी डी वाय एस पी डॉक्टर रोहिणी साळुंखी यांच्याकडे देण्यात आले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा