You are currently viewing १२ बक-या जागीच गतप्राण ; गोठस येथील घटना

१२ बक-या जागीच गतप्राण ; गोठस येथील घटना

कुडाळ
तब्बल बारा बकऱ्यांचा तडफडून अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील गोठस येथे ही घटना रविवारी दुपारी घडली ३ बकरे आणि ९ मादीजातीच्या बकऱ्याचा यात समावेश आहे. या घटनेत सुमारे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याने धनगर बांधवांना धक्का बसला आहे याबाबत पशुसंवर्धन विभागाने पंचनामा केला आहे.

याबाबतची हकीगत अशी, माणगाव खोऱ्यातील निळेली येथील रहिवासी असलेले पंढरी बाबु येडगे यांच्या मालकीच्या ह्या बकऱ्या आहेत येडगे यांनी आज सकाळी अकराच्या सुमारास आपल्या मालकीच्या असलेल्या बकऱ्या नेहमीप्रमाणे चरावयास सोडल्यावर नजीकच असलेल्या गोठोस येथील माळरानावरील बागे जवळ बकऱ्या चालत होत्या चारून झाल्यावर पोट भरल्यावर त्या नजीकच असलेल्या तळीवर पाणी पिण्यासाठी उतरल्या पाणी पिल्यावर अचानक एक- दोन बकऱ्या तडफडू लागल्या आणि जाग्यावरच लोळण घेत पडल्या हा प्रकार बघून मालकालाही काही समजले नाही.

त्याने धावाधाव केली मात्र अन्य बकराही तशा तडफडू लागल्या एक-दोन नव्हे तर तब्बल १२ बक-या जागीच गतप्राण झाल्याने खळबळ उडाली आपल्या डोळ्यासमोर हा प्रकार झाल्याने धनगर बांधवांना धक्काच बसला त्याने ग्रामस्थांना खबर दिली परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी आले याबाबत तात्काळ पशुसंवर्धन विभागाला ही कळवण्यात आली पशु अधिकारी निकम यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला दरम्यान या परिसरात वन्यप्राण्यांचा त्रास अधिक असल्याने शेती-बागायतीचे नुकसान होते त्यामुळे त्याचा बंदोबस्त करण्यासाठी विषारी औषध फवारणी केली जाते त्याचे प्राशन या बकऱ्यानी केले असावे आणि त्यातच त्याला मृत्यू आला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा