You are currently viewing केंद्रीय संसदीय अंदाज समितीकडून चिपी विमानतळाची पाहणी…

केंद्रीय संसदीय अंदाज समितीकडून चिपी विमानतळाची पाहणी…

सिंधुदूर्ग :

आज सोमवार दि.०१ मार्च २०२१ रोजी संसदीय अंदाज समितीकडून सिंधुदुर्ग चिपी विमानतळाची पाहणी करण्यात आली. सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाची पाहणी करण्यासाठी आज संसदीय अंदाज समिती जिल्ह्यात दाखल झाली. या समितीमध्ये अध्यक्ष मा.खासदार श्री.गिरीश बापट डीजिसीआय चे संचालक मा.खासदार श्री.राजीव प्रताप रूढी, मा.खासदार श्री.विनायक राऊत, मा.खासदार श्री.जुगल किशोर शर्मा, मा.खासदार सुदर्शन भगत यांचा समावेश आहे. चिपी विमानतळ सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत असताना या विमानतळाची प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हे विमानतळ सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात होते. परंतु या विमानतळाच्या अन्य कामांसोबतच धावपट्टीची दुरुस्ती देखील बाकी आहे. त्यामुळे डीजीसीआयने विमानतळावरून विमान उड्डाण करायला परवानगी दिली नव्हती.

माञ आता विमानसेवा कायम स्वरूपी सुरू करण्यासाठी हालचालीना वेग आला असून आज जिल्ह्यात चिपी विमानतळाची पाहणी करण्यासाठी संसदीय अंदाज समिती दाखल झाली. खासदार गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने विमानतळाची पाहणी केली.

तसेच आयआरबीच्या अधिकारी आणि विमानतळ व्यवस्थापनाशी चर्चा केली. ही समिती आपला अहवाल भारत सरकारला सादर करणार आहे.चिपी विमानतळाची पाहणी केल्या नंतर डिजीसीएचे संचालक राजीव प्रताप रूढी यांनी चिपी विमानतळ लवकरात लवकर आता सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे तसेच विमानसेवा सुरू झाल्यानंतर सिंधुदुर्ग हा देशाची पर्यटन राजधानी होईल अशी घोषणाही त्यांनी मिडीयाशी बोलताना केली आहे.

*चिपी विमानतळावरून विमान उड्डाण करण्यासाठी अलायन्स एअरलाइन ही कंपनी पुढे आली आहे. या कंपनीचे तिकीट काउंटरचे काम देखील विमानतळावर पुर्ण होआले आहे. अन्य काही कंपन्या या विमानतळावरून हवाई वाहतूक करायला इच्छुक असल्याचे शिवसेनेचेखासदारविनायक राऊत यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.*

प्रतिक्रिया व्यक्त करा