सिंधुदुर्गनगरी
मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल मुंबई यांच्यवतीने दिनांक 22 मार्च 2021 रोजी सकाळी 11.00 वा. मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल मुंबई यांच्या कार्यालयामध्ये 114 व्या डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाणार आहे. विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक व मनिऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा.
संबंधित डाक सेवेबाबतची आपली तक्रार एच.एम. मंजेश, सहाय्यक निदेशक डाकसेवा (ज.शि.) आणि सचिव, डाक अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, मुंबई. जी.पी.ओ. इमारत, दुसरा माळा, मुंबई – 400001 यांचे नावे दोन प्रतीसह दिनांक 5 मार्च 2021 पर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी, त्यानंतर आलेल्या तक्रीरीचे दखल घेतली जाणार नाही, असे अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरी हे कळवितात.