सत्य…
सत्य ह्या असाच असता,
कधी कधी डोळ्याक दिसता…
दिसलेला सगळाच खरा नसता,
तरीपण सत्य हृदयात गाडूचा लागता…
ओठांवर इला तर,
आप्तांच्या मनाक लागता…
कागदावर उतारला तर,
स्वकीयांचे भावना दुखावता…
किती जपून ठेवायचा सगळाच?
मनाची गॅलरी भरून टाकता…
दुःख ओव्हरलोड झाल्यार,
हृदयाक हँग करून ठेयता…
रिस्टार्ट करून कसा बघायचा?
मनाची बॅटरी लो दाखयता…
दाबून दपटून भरल्यार मनाचा,
मेमरिकार्ड करप्ट करता..
कोंडमारो करून मनाक…
शेवटी घुसमाटून मारता…
सत्य ह्या असाच असता..
स्वतःच्या मनाक झुरवत ठेवणारा…
(दीपी)
दीपक पटेकर