भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह निमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विविध कार्यक्रम
सिंधुदुर्गनगरी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह निमित्त दिनांक 08 ते 14 एप्रिल 2026 रोजी पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. 13 एप्रिल 2026 रोजी, सकाळी 7 वाजता सिध्दार्थ नगर, ओरेास येथे स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. यावेळी सिध्दार्थ नगर येथील समाज मंदीर, रस्ते,विहार इत्यादी परिसराची स्वच्छता करण्यात आली.
यावेळी स्वच्छता अभियानास सहायक आयुक्त संतोष चिकणे, समाज कल्याण अधिकारी तुषार गवळी, सहाय्यक लेखाधिकारी उदय यादव, वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक गणेश हुक्किरे, समाज कल्याण विभागाचे अधिकारी/कर्मचारी तसेच ग्रामस्थ/नागरिक, बी.व्ही.जी/क्रिस्टलचे कर्मचारी उपस्थित होते. स्वच्छता अभियानास नागरिकांनी चांगल्या प्रकारचे सहकार्य केले. सहायक आयुक्त संतोष चिकणे यांच्या उपस्थितीत ‘श्रमदान’ करून संपूर्ण परिसर प्लास्टिकमुक्त आणि कचरामुक्त करण्यात आला. “स्वच्छता हा केवळ एक उपक्रम नसून ती एक जीवनशैली आहे. समाज कल्याण विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या सर्व संस्थांमध्ये स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” अश्याप्रकारचा संदेश संतोष चिकणे यांनी दिला.
