You are currently viewing स्वराशा

स्वराशा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*स्वराशा*

 

सुरात न्हाऊ घातले चिंब चिंब या सुंदर सुमनाने

अवघी दुनिया डोलते हसते मोहीत तुझ्या सुराने

 

स्वर एक धुंद गजऱ्यात दूजा असे हरी चरणात

एक लाजऱ्या शृंगारात कधी रसरसत्या लावणीत

 

कधी शांत समईत कधी खळाळत्या उत्साहात

एक पांघरतो मायेची झूल एक भक्कम बिंधास्त

 

एक भिजे विरहात कधी उधळे उत्फुल्ल जोषात

एक सूर विरघळे अंतरी दुसरा नाचे गझल‌ विश्वात

 

सुरांचा गंधार गगनावरी, पारिजात फुले अंतरी

न्हाऊन निघे आसमंत गुंजती सूर अवघ्या धरी

 

या नादात हरपून जाता, सुरांनी तुझ्या व्यापल्या दिशा

स्वरांच्या या मोहमयी दुनियेत अमर‌ ती गाणारी आशा

 

©️®️डॉ मानसी पाटील

प्रतिक्रिया व्यक्त करा