ताल,सूर अवाक होतात………थक्क होते भाषा,
अशावेळी समजून जायचं…..गात असेल आशा!
शब्द असतील नशेचे तर…मैफिल होते मद्यालय!
अभंगाचे शब्द असता…..मैफिल होतेच देवालय!
मधुचंद्र शब्द म्हणताच…..मैफिल गाठते माथेरान,
आणि लावणी गाते तेव्हा,कात शोधू लागतो पान!
आशा या शब्दामधेच……….केवढा आहे आधार!
तिचा गळा साक्षात्…….आषाढ दारात संततधार!
गाणं गाठतो परिणामच……….जेव्हा गाते आशा!
आशा असा शब्द आहे………..मोहच विश्वकोशा!
सुख वजा आशा करा………….शून्य येईल उत्तर!
आशा म्हणजे संगिताच्या……..मनगटावर अत्तर!
काठ तसं पाणी वळतं…………भाव तशी आशा!
मधासाठी आशाकडेच………धावतात मधमाशा!
स्वप्नालाही स्वप्नं पडतं……….अशीच आशा गाते!
पृथ्वीवरच्या मैफिलीची………..स्वर्गात नशा येते!
प्रमोद जोशी,देवगड,9423513604
*भाव पुर्ण श्रद्धांजली स्व.आशाजी*
*संग्रह #अजित नाडकर्णी,शुभांजित सृष्टी*
