सावंतवाडी
कारिवडे येथील जिल्हा परिषद शाळा नं. १ मध्ये सावंतवाडी विधानसभाप्रमुख विक्रांत सावंत यांच्या सहकार्यातून जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा व सावंतवाडी तालुका शिवसेना महिला प्रमुख अपर्णा कोठावळे यांच्या माध्यमातून थर्मल गनचे वाटप करण्यात आले. कोरोना काळानंतर १५ फेब्रुवारीपासून शाळा सुरू होऊन नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील शाळांना शहरातील शाळांसारख्या सुविधा उपलब्ध नाहीत. शिवसेना कारिवडे शाखाप्रमुख रवी गावकर यांनी महिला तालुकाप्रमुख अपर्णा कोठावळे यांच्याकडे थर्मल गनची मागणी केली असता विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत यांच्या सहकार्यातून थर्मल गन शाळा प्रशासनाकडे अपर्णा कोठावळे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. यावेळी शाळा कमिटी अध्यक्ष महेश गावकर, उपविभाग प्रमुख उज्ज्वला कारिवडेकर, शाखाप्रमुख रवी गावकर, ग्रामपंचायत सदस्य विष्णू परब, शाळेतील शिक्षक निकिता पास्ते, विलास आंबोलकर, दीपा चोडणकर, उमेश चव्हाण, शाळेतील विद्यार्थी व पालकवर्ग उपस्थित होते. यावेळी अपर्णा कोठावळे यांच्याकडे शाळा कमिटी अध्यक्ष महेश गावकर यांनी शाळेला आवश्यक असलेल्या गोष्टींची मागणी केली असता.अपर्णा कोठावळे यांनी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर व जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांच्या माध्यमातून शाळेचे प्रश्न मार्गी लावून अत्यावश्यक सुविधा दिल्या जातील असे सांगितले. शिवसेनेकडून घेतलेल्या या उपक्रमाबाबत कारिवडे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.