मंत्री ना श्रीपाद नाईक यांची माड्याची वाडी श्री स्वामिं समर्थांच्या मठात भेट घेऊन दर्शन!
_*पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांचा संस्थानच्या वतीने सत्कार!
मंत्री ना श्रीपाद नाईक यांचाही सन्मान केला गावडे काकांनी!
कुडाळ (प्रतिनिधी)
माड्याची वाडी येथील श्री स्वामिंच्या मठात आज केंद्रीय उर्जा मंत्री ना श्रीपाद नाईक यांनी भेट देऊन दर्शन घेऊन मठाचे संस्थान प्रमुख श्री गावडे काकांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन ना श्रीपाद नाईक यांचा सत्कार करण्यात आला
ना श्रीपाद नाईक यांनी आज माड्याची वाडी येथील श्री स्वामी मठाचे प्रमुख गावडे काका यांच्या पार पडलेल्या वाढदिवसानिमित्त आज सदीच्छा भेट दीली आणि संस्थानच्या वतीने चाललेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती घेतली तसेच विशेष म्हणजे 86 कृष्ठरोगी यांच्यावर यशस्वी उपचार केले होते व पौष्टिक आहार देण्यात आला होता या समाजोपयोगी कामाचे ना नाईक यांनी कौतुक केले
यावेळी नेरुर देऊळवाडा दक्षिण मतदारसंघातुन पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्या बद्दल सौ अर्चना अतुल बंगे यांचा सन्मान मठाचे श्री गावडे काका यांनी केला यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे मठाचे अध्यक्ष एकनाथ गावडे, संचालक सुजय गावडे, पंकज कामत आदी उपस्थित होते
