You are currently viewing बकुळीची फुले

बकुळीची फुले

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा अध्यक्ष कोमसाप सावंतवाडी लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) यांच्या “बकुळीची फुले” काव्यसंग्रहावर ज्येष्ठ शिक्षिका देवयानी आजगावकर यांची स्तुतीसुमने*

 

*बकुळीची फुले* म्हणजे सुगंधाचा परमोच्य बिंदू.. निसर्गाला, मानवाला भूल घालणारी ही फुले.*बकुळीची फुले* हा आपल्या पहिल्या वहिल्या काव्य पुस्तिकेत ६० कविता आहेत… ज्यांचा विषय अवतीभवती घडणारा आहे. त्यामुळे मनाला भावतात या कविता…

*वडापाव* यावर वृत्तबद्ध कविता करणे म्हणजे अफलातूनच!!! फुगलेला तो लालसर वडा

मग पावाच्या मिठीत शिरला… हे वाचताना वडापाव खवय्यांचा चेहरा खुल्याशिवाय राहत नाही.

*साठी आणि ( तरीही )तरणीसाठी!!* या कवितेतून सकारात्मक राहून प्रौढत्वही कसे सुखकर करावे याचा जणू मंत्रच दिलाय आपण. कवटाळून मग जवळी घेता

गळा मिठी बघ घट्ट मारतो .. असा *गोजिरा बाळ* नजरेसमोर उभा राहतो.

आजवर संतांनी जे तत्व सांगितले आहे की देव चराचरात वसलेला आहे… त्याची अनुभूती अंतर्मनाने घेतल्यावरच चराचरात मीच (देव सांगतो) आहे, याचा साक्षात्कार होतो.. हृदयातला देवही त्यामुळेच सापडणार आहे.

दुसऱ्याचे दुःख बघून हृदयात काहीतरी खूपणारे मन दीपकजी आपले आहे. म्हणूनच *”काहीतरी चुकते आहे”* असे आपण कबूल करू शकता…. माणूस पैशाच्या मागे लागो पैशाच्या मागे लागून नातीगोती विसरत चाललाय. त्याची जाणीव करून देऊन समाजाला ताळ्यावर आणण्याचे काम आपली *उतू नको मातू नको* ही कविता सांगते… प्रत्येक कवितेतून एखादा तरी बोध मिळतोच, असे हे आपले काव्य पुष्प भुरळ घालणारे आहे.

आपण आजवर अनेक कविता, लेख, गझल वगैरे साहित्यकृती लिहिल्या आहेत. पण बाबांच्या आग्रहाखातर आपलं पुस्तक आमच्या हाती दिल्याबद्दल धन्यवाद!!!!

अनुक्रमणिकेत साठ कविता ना नंबर दिलेले आहेत. तेच नंबर आतील कवितांना असते तर बरं झालं असतं….👍

“बकुळीची फुले” या नावाचे काव्यपुष्प ही असायला असे होते मनोमन वाटते. अशी अनेक पुस्तके आपली आमच्या भेटीस यावीत… अशा शुभेच्छा!!!!

 

देवयानी त्रिंबक आजगावकर.

न्हावेली ….

9673922567

प्रतिक्रिया व्यक्त करा