मिशन आयएएसचा पुढाकार
विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्येच स्पर्धा परीक्षा देण्याची ओढ लागावी व त्या दृष्टिकोनातून त्यांनी समर्थपणे तयारी करावी यासाठी संपूर्ण भारतामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक 18 महिन्याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणामध्ये वर्ग पाच ते वर्ग बारा चे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या प्रशिक्षणाचे माहितीपत्रक प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पालकांनी किंवा अध्यापकांनी डॉ पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीचे मिशन आयएएस या प्रकल्पाचे संचालक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे यांच्याशी 9890967003 या क्रमांकावर संपर्क साधावा.
मिशन आयएएस हा संपूर्ण भारतातील लोकप्रिय व प्रतिष्ठित प्रकल्प असून या प्रकल्पामध्ये फक्त एक रुपया प्रतिदिन इतक्या अल्प शुल्कामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे ऑफलाइन प्रशिक्षण देण्यात येते. शिवाय याच शुल्कामध्ये विद्यार्थ्यांना पुस्तके सराव परीक्षांची पुस्तके सराव परीक्षा अंतिम परीक्षा गुणपत्रिका व प्रमाणपत्र हे प्रदान करण्यात येते. या उपक्रमामध्ये आतापर्यंत 23 हजार 500 मुले सहभागी झाले असून गुजरात व राजस्थानमध्ये देखील हा उपक्रम सुरू आहे. एक रुपयामध्ये आयएएसचे प्रशिक्षण हे मराठी इंग्रजी व सेमी या तीन भाषांमधून देण्यात येत असून त्याला महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यातून उत्तम प्रतिसाद आहे.
शालेय जीवनात पासून आयएएस या परीक्षेची तयारी करणाऱ्या बाहेरगावच्या मुलांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळावे यासाठी मिशन आयएएस ज्यांच्या बरोबर काम करते त्या दिल्लीच्या मालुका आयएएसने पाचवी ते बारावी या वर्गासाठी ऑनलाईन प्रशिक्षण आखले असून त्याला नाममात्र 2500 एवढे अल्प शुल्क 18 महिन्यांसाठी आहे. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना आय ए एस बाबत सर्व प्रकारचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
मिशन आयएएसमध्ये आतापर्यंत 373 सनदी व राजपत्रित अधिकारी सहभागी झालेले आहेत. याशिवाय मिशन आयएएसने संपूर्ण भारतात 18200 विनामूल्य स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेऊन एक विक्रम केला आहे. याशिवाय मिशन आयएएसने वेळोवेळी स्पर्धा परीक्षेला उपयोगी पडणारी 73 पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. याशिवाय मिशन तर्फे दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मे महिन्यामध्ये सात दिवसांचे स्पर्धा परीक्षा संस्कार शिबीर देखील घेण्यात येते. यावर्षीचे शिबीर हे अमरावती जवळील वलगाव येथील सिकची रिसॉर्ट या भव्य रिसॉर्ट मध्ये आयोजित करण्यात आले आहे.
मिशन आयएएस 26 वर्षापासून हे काम करीत असून यावर्षी संस्थेचा रौप्य महोत्सव आहे. मिशनने महाराष्ट्र शिवाय इतरही राज्यात स्पर्धा परीक्षां बाबत व्यापक जनजागृती केली असून हिंदी भाषिक प्रांतातही मिशन आयएएसला चांगला प्रतिसाद आहे. शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व तत्पर तेजस्वी व तपस्वी होते. स्पर्धा परीक्षेमध्ये त्याला अपयश आले तरी तो कुठल्याही क्षेत्रात गेला तरी त्याचे व्यक्तिमत्व इतके चांगले होते की तो ज्या क्षेत्रात जाईल त्या क्षेत्रात आपले भवितव्य उज्वल करू शकतो. हीच संकल्पना डोळ्यासमोर ठेवून या अभ्यासक्रमाची आखणी केलेली आहे.
प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003
