You are currently viewing एल.ई.डी. बोट धारकांना अभय देणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरोधात वैभव नाईक यांच्या नेतृत्वात शिवसेना आणि मच्छीमारांचा मालवणात भव्य मोर्चा

एल.ई.डी. बोट धारकांना अभय देणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरोधात वैभव नाईक यांच्या नेतृत्वात शिवसेना आणि मच्छीमारांचा मालवणात भव्य मोर्चा

*एल.ई.डी. बोट धारकांना अभय देणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरोधात वैभव नाईक यांच्या नेतृत्वात शिवसेना आणि मच्छीमारांचा मालवणात भव्य मोर्चा*

*मोर्चाला मच्छीमार बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

*राज्य सरकारने मच्छिमारांना हलक्यात घेऊ नये- वैभव नाईक*

*अनधिकृत धंदे करणारे स्थानिक आमदारांचे निकटवर्तिय- परशुराम उपरकर*

मालवण

एल.ई.डी. मासेमारीला संपूर्ण देशात बंदी असूनही मालवण येथे गेले अनेक दिवस बेकायदेशीर एल.ई.डी. मासेमारी राजरोस सुरु आहे. पारंपरिक मच्छीमारांनी यावर वारंवार तक्रारी करूनही राज्य सरकार, जिल्ह्यातील सत्ताधारी आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या बेकायदेशीर एल.ई.डी. मासेमारीवर कोणतीही कारवाई केली जात नाही. पारंपरिक मच्छिमारांवर अन्याय करून एल.ई.डी. मासेमारी करणाऱ्यांना सत्ताधारी अभय देत आहेत. त्याचबरोबर मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या दरातील डिझेलमध्ये देखील दरवाढ करून मच्छीमारांना आर्थिक संकटात लोटले आहे. त्यामुळे राज्य सरकार, मग्रूर झालेले जिल्ह्यातील सत्ताधारी आणि मस्त्य अधिकारी यांच्या विरोधात मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मालवण येथील मत्स्य विभागाच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी मत्स्य अधिकाऱ्यांसमोर मागण्या मांडण्यात आल्या.या मोर्चाला मच्छीमार बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.

याप्रसंगी एल.ई.डी. बोट धारकांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा निषेध असो! एल.ई.डी. हटाव समुद्र बचाव! मच्छिमारांना सवलतीच्या दराने डिझेल मिळालेच पाहिजे! एल.ई.डी. मच्छिमारी बंद झालीच पाहिजे. एल.ई.डी. मच्छिमारी बंद करा नाहीतर खुर्च्या खाली करा! मच्छीमार एकजुटीचा विजय असो! मत्स्य मंत्री तुपाशी मच्छीमार बांधव उपाशी! अशा अनेक घोषणा देत तशा आशयाचे फलक झळकविण्यात आले.

यावेळी माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, गेल्या दोन अडीच वर्षात एल.ई.डी. मच्छीमार बोट धारकांनी किनारपट्टीवर धुमाकूळ घातला आहे. २०१७ पासून एल.ई.डी. मच्छीमारीला संपूर्ण देशात बंदी असताना देखील सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेकायदेशीर एल.ई.डी. मासेमारी सुरु आहे. मत्स्य विभागाने बोटी पकडल्या की सत्ताधारी आमदार बोटी सोडण्यासाठी अधिकाऱ्यांना फोन करतात यात पारंपरिक मच्छीमार भरडला जात आहे. मालवण मधील सत्ताधारी पक्षातील नगरसेवकाच्या चार एलईडी बोट आहेत. एल.ई.डी.मच्छीमारी आताच रोखली नाही तर येणाऱ्या काळात मत्स्यदुष्काळ येईल आणि पारंपरिक मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येईल त्यामुळे राज्य सरकारला जाग आणण्यासाठी हा मोर्चा आम्ही काढला आहे. मोर्चासाठी पारंपरिक मच्छीमारांनी जी एकजूट दाखवली अशीच एकजूट कायम ठेवून हा लढा आपण तीव्र केला पाहिजे. सरकारने देखील मच्छिमारांना हलक्यात घेऊ नये असा इशारा वैभव नाईक यांनी दिला.
माजी आमदार परशुराम उपरकर म्हणाले,शिवसेना आणि मच्छीमार बांधव मोर्चा काढणार हे जाहीर केल्यानंतर पालकमंत्र्यांनी एल.ई.डी. बोटी पकडण्याचे आदेश दिले. परंतु पकडलेल्या बोटी पुन्हा सोडायला लावून मच्छीमारांच्या डोळ्यात पालकमंत्री धूळफेक करत आहेत. वैभव नाईक आज आमदार नसले तरी ते पारंपरिक मच्छीमारांच्या पाठीशी राहिले आहेत.एलईडी धारकांकडून मंत्रालयात दर महिन्याला ५ कोटींचा हप्ता जातो अशी चर्चा सामान्य जनतेत होत आहे. त्यामुळे हप्ते घेणारे मंत्री आपल्याला न्याय देणार नाहीत. अनधिकृत धंदे करणारे व्यक्ती येथील स्थानिक आमदारांचे निकटवर्तिय आहेत. निवडणुकीत हजार, दोन हजार देऊन मते मिळतात त्यामुळे त्यांना पारंपरिक मच्छीमारांचे काहीही पडलेले नाही हे आपण बदलले पाहिजे. जो पक्ष, जो नेता आपल्या सोबत आहे त्याच्यासोबत मच्छीमारांनी राहिले पाहिजे असे आवाहन केले.
यावेळी मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,वेंगुर्ले येथील मच्छीमार नेते श्री.मोहित गिरप, देवगड आनंदवाडी येथील मच्छीमार नेते विष्णू धुरत, मालवण मच्छीमार नेते छोटू सावजी,दिलीप घारे,नारायण कुबल,लवू मालंडकर यांनी आपले विचार व्यक्त करताना मत्स्य मंत्री, आमदार आणि राज्य सरकारवर रोष व्यक्त करत एल.ई.डी.मच्छीमारी पूर्णतः बंद करण्याची मागणी केली.

याप्रसंगी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी,महेश जावकर, मच्छीमार नेते मिथुन मालंडकर, मालवण श्रमिक मच्छीमार संघटना आणि श्रमजीवी रापणकर संघ मच्छीमार नेते छोटू सावजी, मच्छीमार नेते दिलीप घारे, आनंदवाडी मच्छीमार नेते विष्णू धुरत, युवा मच्छीमार नेते मोहित गिरप, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत नगरसेवक तपस्वी मयेकर,नगरसेवीका अनिता गिरकर, शिवसेना महिला आघाडी संघटक दिपाली शिंदे, माजी नगरसेविका पूजा करलकर,गौरी मयेकर, राधिका मोंडकर, उपशहरप्रमुख हेमंत मोंडकर उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, उपशहरप्रमुख गौरव वेर्लेकर, राका रोगे, उपतालुकाप्रमुख उदय दुखंडे, मच्छीमार नेते नारायण कुबल,अन्वय प्रभू, माधुरी प्रभू, सूर्वी लोणे, संजना रेडकर,महेश देसाई, जेम्स फर्नांडिस,स्वप्नील आचरेकर, गणपत आडिवरेकर, किशोर गावकर, सचिन रेडकर, जयराम घाडी, भाऊ परब, विभागप्रमुख समीर लब्दे, विजय पालव, पपू परुळेकर,अमित फोंडके, बाबा पास्कोल, अमोल वस्त, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, आयवान फर्नांडिस,आनंद चिरमुले,मयूर करंगुटकर, समीर लाड, महिला विभागप्रमुख लता खोत, पूजा जोगी, पिंकू फर्नांडिस, मनोज मोंडकर, बंड्या सरमळकर, चंदू खोबरेकर, जयदेव लोणे, फ्रान्सिस फर्नांडिस, प्रसाद दळवी, रुपेश पिळणकर, गौरव दळवी, संतोष मांजरेकर, दीपक चव्हाण, संतोष दळवी, दौलत दळवी, अनिल तळगावकर, विश्वास आचरेकर, प्रवीण सावंत, विजय घाडीगावकर, चंद्रकांत मिठबावकर, बाळा परब, परेश तारी, ऋषी मसुरकर, श्रीकांत बागवे, परेश तारी, रमेश कद्रेकर, राजू मेस्त्री, वायरी सरपंच भगवान लुडबे, मंदार आडकर, बबलू तारी रोहन कुमटेकर,मनीष भगत, गणेश चोपडेकर, बटेश हूर्णेकर,देवानंद मोंडकर,पपी तोडणकर,तेजस तारी बाबी तारी, नाना ढोके, अनंत खोबरेकर, निलेश तारी, अपी धुरी, हेमंत जोशी, ओमकार खोजे,अरुण परब, चंदा जोशी, ललित वेंगुर्लेकर, वासू कोळबकर, विजय खडपकर, पुंडलिक खोरजे,प्रकाश केरकर,वासू गावकर, बाळकृष्ण कोळंबकर, महेश सावंत,दिलीप मंणचेकर,दाजी जोगी, वृषाली तारी, निकिता धुरी, सिद्धी धुरी, नरेश चैतन्य,तारीख केरकर,यतीन आचरेकर, भूषण आचरेकर, गोविंद तोडणकर,शैलेश मोंडकर, गणेश मसुरकर,योगेश आचरेकर,निलेश दुधवडकर, रोहित ढोके, विकी तोडणकर,आल्बेट रॉड्रिक्स, डॉमनेट डिसोजा, विली ब्रीद, मिनिंन फर्नांडिस, मनवेल फर्नांडिस, पास्को ब्रीद,संतोष गोरवले, श्याम घाडी, द्वारकानाथ पेडणेकर, पश्या देसाई,सचिन बागवे, मिथुन माळगावकर, संजू सावंत, रंजन प्रभू, पुष्पक घाडी, नारायण परब, दिलीप पुजारे, दत्तराज तोंडवळकर आदी मच्छीमार बांधव उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा