डॉ.पंजाबराव देशमुख अकादमी च्या मिशन आयएएस या उपक्रमांतर्गत दरमहा शिवजयंती साजरी करण्यात येते. 19 फेब्रुवारीला शिवजयंतीचा मुख्य कार्यक्रम झाल्यानंतर 19 मार्चला स्पर्धा परीक्षेची एबीसीडी हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले असून स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक विनामूल्य वितरित करण्यात आले.येत्या 19 एप्रिलला दरमहा शिवजयंती समिती मार्फत छत्रपती श्री शिवाजी महाराज व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवनावर एका काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या कवींना या उपक्रमात भाग घ्यावयाचा आहे त्यांनी आपल्या कविता दरमहा शिवजयंती या उपक्रमाचे सचिव प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांच्या
9890967003 या क्रमांकावर आपली कविता पाठवावी. या काव्य स्पर्धेमध्ये विजयी होणाऱ्या स्पर्धकांचा 19 मे 2026 रोजी अमरावती येथील सर्वात भव्य असलेल्या व आठ एकरात विस्तार असलेल्या सिकची रिसॉर्टमध्ये बक्षीस समारंभ संपन्न होणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सन्मान म्हणून सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. ज्यांना पोस्टाने कविता पाठवायचे आहे त्यांनी आपल्या कविता प्रा. डॉ
नरेशचंद्र काठोळे सचिव दरमहा शिवजयंती जिजाऊ नगर विद्यापीठ रोड महापौरांच्या बंगल्यासमोर अमरावती कॅम्प
444602 या पत्त्यावर पाठवाव्या असे आवाहन डॉक्टर पंजाबराव देशमुख अकादमीच्या प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आले आहे.
प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003
