*माऊली मतिमंद व कर्णबधिर शाळेमध्ये आरोस दांडेली येथे ऑटिझम डे उत्साहात साजरा*
सिंधुदुर्ग
महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र ओरोस व सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल यांच्या वतीने दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी ऑटिझम दिनाचे औचित्य साधून माऊली मतिमंद विद्यालय दांडेली तालुका सावंतवाडी या शाळेमध्ये जाऊन ऑटिझम डे साजरा करण्यात आला यावेळी माऊली मतिमंद शाळेचे विशेष शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच माऊली कर्णबधिर शाळेचे शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितांचे स्वागत करून झाली. माऊली शाळेचे विशेष शिक्षक नाईक सर यांनी ऑटिझम दिनाचे मार्गदर्शन केले त्यानंतर जिल्हा समन्वयक यांनी उपस्थित विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना निरामया योजनाव कायदेशीर पालकत्व याबद्दल मार्गदर्शन केले. व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राबद्दल व त्यामध्ये मिळणाऱ्या साहित्याबद्दल मार्गदर्शन केले तसेच माऊली मतिमंद व कर्णबधिर शाळा सावंतवाडी तालुक्यातील दांडेली या गावांमध्ये आहे. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र ओरोस येथून ही शाळा सुमारे 70 ते 80 किलोमीटर असून त्या शाळेमध्ये जाऊन जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे यांनी हा कार्यक्रम पार पडला. व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राकडून मतिमंद मुलांना एमआरकीट देण्यात आले त्यानंतर माऊली मतिमंद विद्यालयाच्या शिक्षकांनी उपस्थित यांचे आभार मानून कार्यक्रम संपला असे जाहीर केले.
