You are currently viewing नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त फोंडाघाटमध्ये विविध सामाजिक उपक्रम

नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त फोंडाघाटमध्ये विविध सामाजिक उपक्रम

नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त फोंडाघाटमध्ये विविध सामाजिक उपक्रम

एसटी स्टॅन्डवर खाऊवाटप, प्राथमिक आरोग्य केंद्राला थ्री-फोल्ड बेड, वृद्धाश्रमासाठी प्युरिफायर वाटप

फोंडाघाट :

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणरावजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्त फोंडाघाट येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये एसटी स्टॅन्ड परिसरात खाऊवाटप करण्यात आले, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राला थ्री-फोल्ड ऍडजेस्टेबल बेड देण्यात आले. याचबरोबर वृद्धाश्रमासाठी वॉटर प्युरिफायरचेही वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला पंचायत समिती उपसभापती बबन हळदीवे यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना बबन हळदीवे यांनी नारायणराव राणे यांनी केलेल्या उपकारांची आठवण करून दिली. “गेल्या ४० वर्षांपासून त्यांच्या सोबत राहण्याची संधी मिळाली, हीच माझ्यासाठी मोठी पोचपावती आहे,” असे ते म्हणाले. तसेच राणे साहेबांनी त्यांच्या कुटुंबालाही राजकीय संधी दिल्याचे त्यांनी नमूद केले.
अजित नाडकर्णी हे कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित नसले तरी त्यांनी बबन हळदीवे यांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमादरम्यान फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.
दरम्यान, सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या पुढील कार्यक्रमासाठी पुष्पगुच्छ न आणता पुस्तके भेट देण्याचे आवाहन राणे यांनी केल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
अजित नाडकर्णी, संवाद मीडिया

प्रतिक्रिया व्यक्त करा