You are currently viewing चिमण्यांची सकाळ

चिमण्यांची सकाळ

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री कला शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*चिमण्यांची सकाळ*

🐦🐦🐦🐦🐦🐦🐦

 

सकाळी च इस्त्री चा युनिफॉर्म

घालून चिऊताई छान तयार होई

किती गोड सुंदर सकाळ ही

शाळेत जायची जणू तिला घाई.

 

जणूकाही त्यांना शाळेत न्यायला

उगाच उशीर नको व्हायला म्हणून

येणार आहे वेळेवर तो बसवाला

अगदी छान टापटीप तयारी करुन.

 

चिऊताईंच्या मित्रiचाघोळका

बसलाय बुंध्यावर गिळून आवेष

एव्हाना केली असती चिवचिव

विस्कटेल ना शाळेचा गणवेष

 

आज आहे परेड एकदम कडक

उशीरनको म्हणून आवरले लवकर

हिरव्यागार गवतावर मऊ गादी

रानामधल्या शाळेची कशाला ना सर

 

इथून तिथून येती रानभर चिमण्या

नाजूक सुंदर गोड गोजिरवाण्या

आता उठली राने, सिमेंटची जंगले

इमारतीगराड्यात होती केविलवाण्या.

🐦🐦🐦🐦🐦🐦🐦🐦

 

स्वप्नगंधा सतीश आंबेतकर

कलाशिक्षिका.

प्रतिक्रिया व्यक्त करा