You are currently viewing कोकणचे भाग्यविधाते नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगडमध्ये विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांची मेजवानी
Oplus_16908288

कोकणचे भाग्यविधाते नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगडमध्ये विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांची मेजवानी

लघुरुद्र, रिक्षा-टेम्पो चालकांना मोफत इंधन, महिलांसाठी “खेळ पैठणीचा” स्पर्धा आणि भजन स्पर्धेचे आयोजन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षित

देवगड :

कोकणचे भाग्यविधाते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार सन्मा. नारायणराव राणे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देवगड शहरात विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ वाजता श्री देव ब्राम्हणदेव मंदिर, देवगड येथे राणे साहेबांच्या दीर्घायुष्यासाठी लघुरुद्राचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर सकाळी ९.३० वाजता नगरसेवक बुवा तारी व नगरसेविका सौ. प्रणाली माने यांच्या पुरस्कृत देवगड-जामसंडे शहरातील रिक्षा व टेम्पो व्यवसायिकांसाठी मोफत १ लिटर पेट्रोल व १ लिटर डिझेल वितरणाचा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या उपक्रमामुळे स्थानिक वाहनधारकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हा लाभ फक्त देवगड-जामसंडे शहरातील रिक्षा व्यवसायिकांसाठीच मर्यादित ठेवण्यात आला आहे.

तसेच दि. १५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता महिलांसाठी “खेळ पैठणीचा” या आकर्षक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमात प्रथम बक्षीस म्हणून १५,००० रुपयांची पैठणी, सोन्याची नथ तसेच सहभागी महिला स्पर्धकांसाठी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. याशिवाय मोफत लकी ड्रॉद्वारे विजेत्यांना विविध बक्षिसे दिली जाणार आहेत.

दि. १६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता निमंत्रित दिंडी भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक १०,००० रुपये व चषक, द्वितीय पारितोषिक ७,००० रुपये व चषक, तर तृतीय पारितोषिक ५,००० रुपये व चषक असे ठेवण्यात आले आहे.

तालुक्यातील सर्व महिला माता-भगिनींनी “खेळ पैठणीचा” कार्यक्रमास उपस्थित राहावे तसेच सर्व भजनप्रेमींनी भजन स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन भाजपा जेष्ठ नेते बाळ खडपे, मंडल अध्यक्ष राजा भुजबळ, बंड्या नारकर, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, महिला माजी भाजपा उपाध्यक्षा प्रियांका साळसकर, महिला मोर्चा अध्यक्षा उषःकला केळुस्कर व महिला शहराध्यक्षा तन्वी शिंदे यांनी केले आहे.यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेस आजी-माजी नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा