देवगड
पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होत असते.
गेल्यावर्षी येथील समुद्र किनारी लाटांमुळे किनारपट्टीची धूप व सुरूच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे तांबळडेग मोर्वे हिंदळे मिठबांव या गावांना भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब स्थानिक ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. यानंतर पावसाळ्यात झालेल्या किनारपट्टीची धूप आमदार नितेश राणे यांनी पाहणी करून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या.
तांबळडेग समुद्र किनारपट्टीला धूपप्रतिबंधक बंधारा होणे गरजेचे आहे या प्रकारची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी आमदार नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. नैसर्गिक आपत्तीमुळे या गावासह इतर गावांचे समुद्राच्या लाटांनी नुकसान होऊ नये यासाठी आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नाने तांबळडेग समुद्र किनारी धूप प्रतिबंधक बंधारा मंजूर झाला आहे.
या कामाचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते गुरुवारी संपन्न झाले.
धूपप्रतिबंधक बंधारा झाल्यानंतर तांबळडेग गावासह अन्य गांवाच्या सुरक्षेच्यादृष्टीने प्रश्न रहाणार नाही नैसर्गिक आपत्ती मुळे येथे समस्या निर्माण होणार नाही असे प्रतिपादन आमदार नितेश राणें यांनी केले.
या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण आरोग्य सभापती सावी लोके, तांबळडेग सरपंच अंजिंता कोचेकर उपसरपंच लवेश भाबल, भाजप देवगड तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, माजी सभापती सुनीलभाई पारकर, प्रकाश राणे, बाळ खडपे, सभापती रवी पाळेकर, उपसभापती रवींद्र तिर्लोकर, पंचायत समिती सदस्य निकिता कदम, ग्रामपंचायत सदस्य सहदेव कोचेकर, संजना मालडकर, माजी उपसरपंच रमाकांत सनये, देवानंद केळूसकर, उदय कोंयडे आदी उपस्थित होते.