You are currently viewing वैभववाडी पंचायत समिती उपसभापतीपदी अरविंद रावराणे यांची बिनविरोध निवड

वैभववाडी पंचायत समिती उपसभापतीपदी अरविंद रावराणे यांची बिनविरोध निवड

वैभववाडी

पंचायत समिती उपसभापती पदासाठी अरविंद भास्कर रावराणे यांचा बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. या उपसभापती पदाच्या निवडणूकीसाठी भाजपचे अरविंद रावराणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार रामदास झळके यांनी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. त्यांची निवड जाहीर होताच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाक्याची अतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.
यावेळी वैभववाडी मंडळ अध्यक्ष नासीर काझी, वीत्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जिल्हा चिटणीस भालचंद्र साठे, पंचायत समिती सभापती अक्षता डाफळे, माजी उपसभापती दुर्वा खानविलकर, भाजपा जिल्हा सदस्य राजेंद्र राणे, पं.स.सदस्य हर्षदा हरयाण, बाळा हरयाण, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राजू पवार, भारती रावराणे, विद्या पाटील, शुभांगी पवार, प्राची तावडे, प्रकाश सावंत, संताजी रावराणे, किशोर दळवी, महेश रावराणे, प्रकाश शेलार, बंधू वळंजू, संजय सावंत, रज्जब रमदुल, रमेश पवार, सचिन तळेकर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपा पक्षीय धोरणानुसार उपसभापती दुर्वा खानविलकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे गेले काही दिवस उपसभापती पद रिक्त झाले होते. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांनी उपसभापतीपदी अरविंद रावराणे यांचे नाव घोषित केले. त्यानुसार ही निवड जाहीर करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा