You are currently viewing भूकेला.. कळत नाही…!!
Oplus_16908288

भूकेला.. कळत नाही…!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*भूकेला.. कळत नाही…!!*

 

देह मुळातचं नश्वर

आत्मा ईश्वराच्या चरणी

भूक पोटात शिरताच

दुभंगते निरागस धरणी..

 

पावलागणिक पसरणारी भूक

देवा..तु ही आठवत नाही

ॠणाइतकं प्रिय स्वअस्तित्व

काहीही …सुचत नाही..

 

घोटाळणा-या भूकेचा वास

सतत.. कूस बदलतो

मलूल चेह-यावर एकवटताचं

वरती …बोटं दाखवतो..

 

खादाड निलाजरी लाचारी

भूकेला.. कळत नाही

वदनी ..कवळ ..घेता

भुकेल्यांच्या ..नशिबी नाही..

 

दैववशात भूकेने हेलकावतांना

लोंबकळते जिद्द अधांतरी

कोलाहलाचं घर उभारून

आभासात भूकेसोबत कोसळणारी..

 

आक्रोशाचा अंत होईलही

भूकेला ..तेही कळत नाही

गोपुरे डोळ्यांत मावळतांना

ईश्वरालाही. .. उमगत नाही..

 

भूकेला काहीच कळत नाही

ईश्वरही आठवत…नाही..

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा