*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार यांची साकव्य लावणी स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त लावणी*
*कोंदण*
इश्काच्या दागिन्याला प्रेमाने मुलामा चढवा
राया हिरा जरा हळूच कोंदणात मढवा ||धृ||
ज्वानीच्या बाजारी उभी इष्काची सावकारी
आज नगद मिळेल उद्या ठेऊया उधारी
आधी राया दिलाने अंतरी प्रीत जुळवा
राया हिरा जरा हळूच कोंदणात मढवा ||१||
दागिना बघून घ्या सोन्याचा पाचू मोत्याचा
बावनकशी कस भाव चोवीस कॅरेटचा
निरखून पारखून डावा डोळा फिरवा
राया हिरा जरा हळूच कोंदणात मढवा ||२||
अलंकार लेऊन सजली धजली नार
उभार अंगाला सोसना ज्वानीचा भार
ज्वर चढला इष्काचा वैद्याची दवा मिळवा
राया हिरा जरा हळूच कोंदणात मढवा ||३||
कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर,धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.
