You are currently viewing पतंजली योग समिती सिंधुदुर्गतर्फे सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

पतंजली योग समिती सिंधुदुर्गतर्फे सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

पतंजली योग समिती सिंधुदुर्गतर्फे सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

सिंधुदुर्ग :

पतंजली योग समिती सिंधुदुर्ग यांच्या वतीने योग क्षेत्रात कार्य करू इच्छिणाऱ्यांसाठी सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण शिबिर दिनांक ०५ एप्रिल २०२६ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडणार आहे.
या शिबिरात सहभागी होणाऱ्यांना त्यांच्या सोयीप्रमाणे ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेत प्रात्यक्षिक सत्रे, तर संध्याकाळी सायंकाळी सात ते नऊ या वेळेत ऑनलाईन थेअरी वर्ग घेतले जाणार आहेत.
या प्रशिक्षणामध्ये योगाशी संबंधित विविध विषयांचा सखोल अभ्यास करून घेतला जाणार आहे. यामध्ये रोगानुसार योगासने, योगाचा अभ्यासक्रम, मूलभूत सिद्धांत, दैनिक योगाभ्यास, गीता दर्शन, घरगुती रोगोपचार, प्राणायाम, सूर्यनमस्कार, अष्टांग योग, पंचकोश, ॲक्युप्रेशर, मुद्रा तसेच वैदिक शिक्षण अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश आहे.
केवळ २५ दिवसांत सुमारे १०० तासांच्या प्रशिक्षणाद्वारे सहभागीांना परिपूर्ण योगशिक्षक बनविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सहभागीांना पतंजलीकडून सहयोग शिक्षकाचे प्रमाणपत्र दिले जाणार असून त्यामुळे रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होणार आहेत.
या शिबिरासाठी मर्यादित जागा उपलब्ध असल्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी विद्याधर पाटणकर (९४०४१६९८५५), डॉ. तुळशीराम रावराणे (७०८३६०२५०४), विकास केरकर (९४०४४९६४३४), डॉ. प्रशांत परब (९६७३३७२४८५) व बाबली गवंडे (८३९०९०५२६९) यांच्याशी संपर्क साधावा. 🕉️

प्रतिक्रिया व्यक्त करा