*ज्येष्ठ लेखिका कवयित्री कला शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पितृछत्र मोलाचे*
एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात
शेवटचे घरटे बाबा तुझ्या अंगणात
तुझ्याविना नाही जगती आधारहात
छत्र तुझे शिरावरी, सुखअसे जीवनात
पितृछत्र ज्याना मिळे, नशीबाची साथ
बाबाविना मुले होती पोरकी अनाथ
पृथ्वीवरी जन्म घेता नाम तुझे लागे
वारसा घराण्याचा कुलदीपक सनाथ
किती मौल्यवान बाबा तुझे असणे
कळेना तुलाही, तुझ्याविना ना हसणे
सार्या कुटुंबाचा तू असशी आधारवड
आम्ही पारंब्या तुझ्याच, वंशाचे रुजणे
बाबा तुझ्या हृदयी माया असे अपार
कठोर शिस्तीचा दाखवशी भडिमार
मुलांसाठी असतो बाबा राखणदार
करिशी तू मुलांवरी नकळत सुसंस्कार
जबाबदार पालनकर्ता सांभाळी घरदार
कुटुंबवत्सल असशी परी कर्तव्य कठोर
अंगाखांद्यावर खेळवी कधी वेळेनुसार
कष्ट ओझ्याचा भार नितअसे तुझ्यावर
ज्यांना नाही पितृछत्र ती मुले पोरकी
आईची कूस माया मिळे वात्सल्याची
सार्या जगासमोर ती निराधार परकी
बाबा तुझ्याविना हौस कशी पुरवायची
पित्याविना लेकरे सांभाळता माऊली
आयुष्य होई पार, जीवघेणे निराधार
अश्रू पिऊन जगता तीच होई साऊली
बाळांचे पितृछत्र हरपता नसे आधार
तीच घडवी, वाढवी करुनी सुसंस्कार
कष्टाचा उपसता डोंगर, कधी उपासमार
घराण्याचे नाव जपता, मुलांना आधार
पितृछत्राचे मोल जपावे, करी संस्कार
पित्याविना बाळाचे दु:ख जडभारी
लाड, कौतुक, हौस, मौज न मिळेत्यासी
पितृछत्र हरपल्यास ना कोण विचारी
मोल पित्याचे अनमोल नसे नशिबासी
😔😢
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर
कलाशिक्षिका.
