*!! March End Special !!*
*!! हिशोब काय ठेवायचा !!*
*काळाच्या निरंतर वाहत्या प्रवाहा मध्ये..*
*आपल्या थोड्या वर्षांचा..*
*हिशोब काय ठेवायचा ..*
*आयुष्याने भर भरून दिले असताना..*
*जे नाही मिळाले त्याचा..*
*हिशोब काय ठेवायचा.. ! !*
*मित्रांनी दिले आहे, अलोट प्रेम इथे…*
*तर शत्रूंच्या बोलण्याचा , हिशोब काय ठेवायचा..!!*
*येणारा प्रत्येक दिवस , आहे प्रकाशमान इथे..*
*तर रात्रीच्या अंधाराचा, हिशोब काय ठेवायचा..!!*
*आनंदाचे दोन क्षण ही, पुरेसे आहेत जगण्याला..*
*तर मग उदासिनतेच्या, क्षणांचा..*
*हिशोब काय ठेवायचा..!!*
*मधुर आठवणींचे क्षण , इतके आहेत आयुष्यात..*
*तर थोड्या दु:खदायक गोष्टींचा..*
*हिशोब काय ठेवायचा..!!*
*मिळाली आहेत फुले इथे,कित्येक सहृदा कडुन..*
*मग काट्यांच्या टोचणीचा.. हिशोब काय ठेवायचा..!!*
*चंद्राचा प्रकाश आहे,जर इतका आल्हाददायक..*
*तर त्यावरील डागाचा.. हिशोब काय ठेवायचा..!!*
*जर आठवणीनेच होत असेल, मन प्रफुल्लित ..*
*तर भेटण्या न भेटण्याचा..हिशोब काय ठेवायचा..!!*
*काही तरी नक्कीच..खुप चांगलं आहे सगळ्यांमधे..*
*मग थोड्याशा वाईटपणाचा, हिशोब काय ठेवायचा..!!*
*!!आज मार्च अखेर… आपल्या सर्वांना शुभेच्छा!!*
*संग्रह #अजित नाडकर्णी,शुभांजित shrushti*
🙏🙏🙏🌹🌹🌹
