१० ते १४ एप्रिलदरम्यान क्रीडा संकुल मैदानावर रंगणार सामने; विजेत्यास १ लाख २६ रुपयांचे बक्षीस
सिंधुदुर्गनगरी :
मयूर राणे मित्र मंडळ, ओरोस यांच्या वतीने १० ते १४ एप्रिल या कालावधीत सिंधुदुर्गनगरी येथील क्रीडा संकुल मैदानावर खासदार चषक अंतर्गत खुल्या ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला १० एप्रिलपासून सुरुवात होणार आहे.
स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, दि. १० एप्रिल रोजी नारायण राणे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख उपस्थितीत नितेश राणे व निलेश राणे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेत विजेत्या संघास १,००,०२६ रुपये, उपविजेत्या संघास ५०,०२६ रुपये तर उपांत्य फेरीत पराभूत संघांना प्रत्येकी ५,०२६ रुपये प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात येणार आहे.
कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, शिवसेना महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष दीपलक्ष्मी पडते तसेच जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया वालावलकर यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
स्पर्धेतील सर्व सामने दररोज सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होणार असून खेळाडूंना ट्रॅक पॅन्ट व शूज हा ड्रेस कोड अनिवार्य करण्यात आला आहे. इच्छुक संघांनी अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी ९२२६८७९२७९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

