मुंबई :
(बबनराव आराख) राष्ट्रसंत यांच्या विचारांचा प्रसार,तसेच समाजात सकारात्मक बदल घडवून यावा म्हणून सातत्याने कार्य करणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील सातगाव मसला येथील शिवाधिकारी प्रमोद दादा दांडगे यांना महाराष्ट्र शासनाकडून व्यसनमुक्ती व समाजप्रबोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘राज्यस्तरीय सन्मानाने’ गौरविण्यात आले.
मुंबई येथे पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते,प्रमोद दांडगे यांना मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.
प्रमोद दांडगे यांचा दैनंदिन जीवन प्रवास वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारधारेवर चालत असून ते अहोरात्र समाजसेवेचे कार्य करीत आहेत. व्यसनमुक्ती अभियान, समाजप्रबोधन आणि ग्रामीण भागात जजनगृती निर्माण करण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत.
