वाढदिवसानिमित्त शुभम घावरे यांची सामाजिक बांधिलकी; रुग्णांसाठी कमोड चेअर भेट
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याला हातभार;
सावंतवाडी
सामाजिक कार्यकर्ते शुभम रावजी घावरे (बिरोडकर टेंब) यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत एक प्रेरणादायी उपक्रम राबविला. त्यांनी ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’च्या सेवाभावी कार्याची दखल घेत संस्थेला कमोड चेअर भेट देत गोरगरीब रुग्णांसाठी मोलाचे योगदान दिले.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजू रुग्णांना विविध रुग्णोपयोगी साहित्य पुरवले जाते. या कार्यात अनेक दानशूर व्यक्ती आपापल्या परीने सहकार्य करत असतात. त्याच परंपरेत शुभम घावरे यांनीही आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत संस्थेच्या कार्यालयात भेट देऊन ही मदत सुपूर्त केली.
यावेळी संस्थेचे रवी जाधव, शरदिनी बागवे आणि लक्ष्मण कदम उपस्थित होते. शुभम घावरे यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, त्यांच्या या कृतीमुळे इतरांनाही समाजकार्यासाठी प्रेरणा मिळत आहे.
