*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”नेपाळचे वैभव”*
नेपाळ आहे विश्वातील छोटे राष्ट्र पवित्र
ने ऋषींनी नेपाळचे केले वसन रक्षणIIधृII
गुरख्यांची वस्ती आहे निसर्ग सौंदर्य आंदण
प्रजाजन वागे आदबिनं सर्वां सामावून
अतिथींचे करती स्वागत सन्मानानंII1II
गौतम बुद्ध जन्मस्थान मायावतीचे दर्शन
गुप्तेश्वर महादेव विंध्यवासिनीचे दर्शन
फेवा तलाव नौकाविहार देवीचे दर्शनII2II
मनोकामना देवी नवदुर्गांचे होते दर्शन
साहसानं जातात दोर झुला पाळण्यांतून
पर्वत शिखरी माता बैसली सुरम्य दर्शन II3II
केदारनाथ पशुपतीनाथांचे संबंध अतूट
पार्वती मंदिर आहे सुंदर शोभिवान
काळभैरव आहे उभा साक्षीला सोबतII4II
बोधनाथ विश्वातील भव्य स्तूप प्रसिद्ध
चितवन सफर आहे सुरम्य दर्शन
बुढानिळकंठ विष्णू शेषशाही करी शयनII5II
त्रिशूला बागपती गंडगी त्रिवेणी नारायणी
वाढवती हिम पर्वत शिखरांचे वैभव शान
वनौषधी शेती कलाकुसर उत्पन्न साधनII6II
प्रजा शांत सुखी नांदते आहे समाधानानं
रस्ते इमारती आहेत नियोजन बद्ध
छोटा देश आहे पर्यटनासाठी आकर्षणII7II
©️कवी.श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.भारत.
पिन.410201.Cell.9373811677.
